Monday , September 21 2026
Breaking News

सहकार क्षेत्रात राजकारण असू नये : शिलवंत

Spread the love

 

विजयपूर : अलीकडे काही सहकारी पतसंस्था राजकीय लाभासाठी, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देशाने सुरू करण्यात येत आहेत किंवा चालविण्यात येत आहेत हे योग्य नसून सहकारी क्षेत्रात राजकारण असू नये असे मत सहकार भारती कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखर शिलवंत यांनी व्यक्त केले.
विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पतसंस्था व विविध उद्धेशिय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलताना ते पुढे म्हणाले, एकीकडे राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बॅंक यांच्यातील चढाओढ, त्यासमोर सहकारी पतसंस्था चालविने अवघड झाले आहे, त्यासाठी सहकारी पतसंस्थानी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सहकार भारती जिल्हा अध्यक्ष डॉ. आर. आर. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी सहकार भारती जिल्हा मुख्य सचिव सुभाष इंडी यांनी स्वागत केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारती राष्ट्रीय संरक्षक रमेश वैद्य, कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारीचे संचालक मंडळ सदस्य गुरुनाथ जाकतीकर, विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजशेखर गुडदिन्नी, संचालक मंडळाचे सदस्य गुरुशांत निडोणी, संयुक्ता पाटील, ए. बी. पाटील, हर्षगौडा पाटील, श्रीमंत इंडी, सहकार भारती राज्य संघटना सचिव मंजुनाथ उपस्थित होते.
निवृत्त राज्य अप्पर निबंधक एम. जी. पाटील व भास्कर हेगडे यांनी उपस्थित सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, व कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले. शेवटी सहकार भारती जिल्हा संघटना सचिव दिपक शिंत्रे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *