तालुका पंचायतीचे ईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या पीडीओ आरती आंगडी याची मनमानी होत असुन सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जी प्रमाणे कामे करत असून अशा पीडीओ अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी, अशा मागणीचे निवेदन हेब्बाळ ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याच्या वतीने तालुका पंचायतीचे ईओ अधिकाऱ्यांना …
Read More »मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील रस्त्याच्या कामानिमित्त शनिवार, रविवार वाहतूक बंद
खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वेगेटवर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी व रविवारी खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम …
Read More »निपाणी येथे आढळले नवजात अर्भक!
अधिकाऱ्यांनी दाखवली माणुसकी : अर्भक बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या बदलमुख रस्त्याच्या कडेला गुरुवारी (ता.२४) सकाळी नवजात अर्भक आढळून आले. पुरुष जातीचे अर्भक एका पिशवीत सोडले होते. साक्षीदाराने अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार महिला व बालविकास अधिकारी, डी. बी. सुमित्रा, डॉ. जी. बी. मोरबाळे यांच्या …
Read More »शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद करू : के. के. कोप्प वासीयांचा निर्धार
खानापूर (प्रतिनिधी) : के. के. कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. यावेळी शेतकरी वर्गाने, कोणत्याही परिस्थितीत आपली १ इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही, अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात …
Read More »..म्हणे सोलापूर, अक्क्लकोटही घेऊ : बोम्मई यांचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न
बेंगलोर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला देणार नाही, असं स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा ट्वीट करुन मराठी भाषिक आणि महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर कर्नाटकात विलीन करावेत, अशी मागणी करुन कर्नाटकची एक इंच भूमी …
Read More »जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन
खानापूर : खानापूर तालुक्यात लम्पिने धुमाकुळ घातला आहे. लम्पिमुळे तालुक्यात अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कारलगा येथे लम्पिमुळे सुनील मनोहर पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. कारलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी तात्काळ पशु …
Read More »सीमाप्रश्नी कर्नाटकची लवकरच सर्व पक्षीय बैठक
मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षाना पत्र, सीमा सल्लागार समिती स्थापन्याची सिध्दरामय्यांची सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र लिहून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील याचिकेच्या संदर्भात लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते सिध्दरामय्या यांनी या प्रश्नी सल्लागार समिती स्थापन करण्याचा …
Read More »माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची काँग्रेस नेत्याला शिवीगाळ
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते एचडी कुमारस्वामी कोलारच्या श्रीनिवासपुरा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात कुमारस्वामी यांनी रागाच्या भरात अपशब्द वापरले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कोलारमधील श्रीनिवासपुरा येथील काँग्रेसचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांना एचडी कुमारस्वामी …
Read More »२८ नोव्हेंबर रोजी गंदिगवाडात पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे. तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर …
Read More »यरनाळ येथे ग्रंथालय सप्ताह दिन साजरा
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta