Monday , April 20 2026
Breaking News

मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील रस्त्याच्या कामानिमित्त शनिवार, रविवार वाहतूक बंद

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वेगेटवर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी व रविवारी खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम होत असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यावेळी मणतुर्गा जवळ असेलेल्या रेल्वे गेटवरील संपर्क रस्त्यावर डांबरीकरण शनिवारी व रविवारी केले जाणार आहे.
हे काम युद्ध पातळीवर सुरू होणार असून दोन दिवसांपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे खानापूर हेम्माडगा अनमोड रस्ता वाहतूकीस बंद ठेवण्यात येणार आहे
यावेळी हुबळी विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी येथील खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्य काही अभियंत्याने पत्र पाठवून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची सुचना केली आहे.

यावेळी लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामांतर्गत रेल्वे गेटवर दोन्ही बाजूंना संपर्क रस्त्याचे प्रत्येकी दहा मीटर डांबरीकरण करण्याची रेल्वे खात्याची जबाबदारी आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधकांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे खानापूर अनमोड रस्ता बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

असोगामार्गे प्रवास
अनमोड रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील मणतुर्गा, नेरसा, अशोकनगर, शिरोली, डोंगरगाव, हेम्माडगा आदी गावच्या प्रवाशांना, वाहन चालकाना पुन्हा दोन दिवस असोगामार्गे प्रवास करावा लागणार आहे. अथवा गोव्याला जाणाऱ्या वाहनधारकांना रामनगर मार्गे प्रवास करावा लागणार आहे, अशी माहिती रेल्वे अभियंते शशिधर यांनी सांगितले.
यावेळी भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका यांनी वाहनधारकांना दोन दिवस वाहतुक बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी भाजपचे नेते प्रकाश निलजकर, रवी बडगेर तसेच अभियंते तेजी व जेबीहुल्ला आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन

Spread the love  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *