खानापूर : उद्या रविवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी इदलहोंड ग्रामपंचायत व निट्टूर ग्रामपंचायतमध्ये म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असून याची सुरुवात अनुक्रमे खेमेवाडी, माळअंकले, झाडअंकले, सिंगीनकोप, इदलहोंड, निट्टूर व त्यानंतर रात्री 8 वाजता सांगता गणेबैल येथे होणार आहे, तर सोमवार दिनांक 21 …
Read More »काटगाळी शाळेत एंजल फाउंडेशनतर्फे खाऊ वाटप
खानापूर : शहरातील एंजल फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील काटगाळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी नुकतीच काटगाळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि अंगणवाडी क्र. 49 ला सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षक …
Read More »गर्लगुंजीच्या कणवीच्या उतारतीला हुदलीचा प्रवाशी टेम्पो पलटी
अनेक जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावापासून उत्तर दिशेला असलेल्या आजोबा मंदिर जवळच्या कणवीच्या उतारतीला हुदली येथून आलेला पॅसेंजर टेम्पोला न्यूट्रल मध्येच ब्रेक न लागल्याने दोन पलट्या घेऊन पलटी झाल्याने प्रवासी टेम्पोतील जवळपास २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. मात्र दैवबलवत्तर म्हणून जीवीतहानी …
Read More »खानापूर जांबोटी क्राॅसवर भरदिवसा पथदीप सुरूच
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील खानापूर जांबोटी महामार्गावर शुक्रवारी दि. १८ रोजी भरदिवसा पथदिप सुरूच होते. एकीकडे हेस्काॅम खात्याचे वीज बचत करण्याचे आवाहन करते. वेळेत बील भरले नाही. तर वीजपुरवठा बंद करते. मात्र भर दिवसा शहारातील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत खांबावर दिवसा पथदिप सुरूच असतात. असाच प्रकार मागील …
Read More »इरफान तालिकोटी यांना खानापूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि समाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांना कर्नाटक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाकडे दिले. इरफान तालिकोटी हे खानापूर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. केपीसीसी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आव्हान केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी …
Read More »बेळगावात १९ डिसेंबरपासून दहा दिवस हिवाळी अधिवेशन
मंत्रिमंडळाचा निर्णय; गोकाक येथे माता-बाल रुग्णालय, नवीन चंदन धोरणास मंजूरी बंगळूर : विधिमंडळाचे अधिवेशन येत्या १९ ते ३० डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्ये घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. …
Read More »कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी
पटकावले एक लाखाचे बक्षीस : सिल्वासा संघ उपविजेता निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकाऱ्यांने गुरुवारी (ता.१७) झालेल्या ‘अरिहंत चषक’ फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सिल्वासा संघाला ४-० फरकाने हरवून कोल्हापूर येथील बालगोपाल संघाने विजय मिळवला. त्यामुळे या संघाने रोख १ …
Read More »नगरसेवक तोहिद यांच्या प्रयत्नाने कूपनलिका खुदाई
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर २ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर दोनचे नगरसेवक तोहिद चांदखन्नावर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर दोन मधील रहिवासी जॅकी फर्नाडीस, इस्माईल नंदगडी, राजेंद्र रायका, विशाल रायका, शंकर देसाई, आर. आय. …
Read More »गर्लगुंजीच्या सुपुत्राचा इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग
गर्लगुंजीचा सुपूत्र सध्या गोव्यात राहणारा नेहल तुकाराम पाटील याचे इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग खानापूर (प्रतिनिधी) : मुळचा गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचा सुपूत्र सध्या गोवा येथील पोलिस खात्याचे अधिकारी तुकाराम पाटील यांचे चिरंजीव नेहल तुकाराम पाटील याने गेल्या महिन्यात चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या मी. इडिया स्पर्धेत लुक ऑफ द इअर …
Read More »निलावडे ग्रा. पं. च्या रोजगार हमी योजनेतून जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी चर खोदण्याचे काम
खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत वनखात्याच्या हद्दीपासून जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी चर खोदण्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. वनखात्याच्या हद्दीपासून दीड मीटर खोली, तळ एक मीटर रुंद अशा पद्धतीने चर मारण्यात आली. यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta