Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

गीता राऊत, पूजा शिंदे यांचा साळुंखे गारमेंटतर्फे सन्मान

निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरमधील साळुंखे गारमेंटचा सातवा वर्धापन दिन पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे व्यवस्थापक गंगाप्पा उपस्थित होते. प्रारंभी विनोद साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन वाटप करण्यात आला. साळुंखे गारमेंट यंदाचा बेस्ट ऑपरेटरचा पुरस्कार  साखरवाडीमधील गीता राऊत यांनी पटकावला. तर बेस्ट हेल्पर …

Read More »

राज्यातील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफची तुकडी

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक तीन जिल्ह्यांमध्ये एक एसडीआरएफ पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले . राज्य नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि एसडीआरएफ संचालनालयाच्या जवानांना राजभवन येथे राष्ट्रपती पदक प्रदान समारंभात ते बोलत होते, ज्यांनी आपल्या प्राणांची …

Read More »

मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या निवडणुकीला सामोरे जा

  खर्गे यांचा पक्षातील नेत्यांना सल्ला, अभिनंदन मेळाव्यात मोठी गर्दी बंगळूर : एआयसीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन एम. खर्गे यांनी रविवारी सायंकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मतभेद बाजूला ठेवून २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचे स्पष्ट आवाहन केले. भाजपमध्ये देखील आपापसात ऐक्याचा अभाव असल्याचे सांगून कॉंग्रेस पक्षातही मतभेद असल्याचे …

Read More »

दहा हजार दिव्यांनी उजळले महादेव मंदिर

कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : महादेवाची पालखी प्रदक्षिणा निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीत मधील महादेव मंदिरात सोमवारी (ता.७) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिर सह सांस्कृतिक भवनात भाविकांनी दहा हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. त्यावेळी रेखाटलेल्या रांगोळ्या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले. प्रारंभी महादेवाच्या पालखीची प्रदक्षिणा …

Read More »

खानापूर शहरातील सांडपाण्याची प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांकडून पाहणी

  बेळगाव : “बेळगांव वार्ता”च्या बातमीची दाखल घेत खानापूर शहरातील सांडपाण्याची प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी पाहणी केली. खानापूर शहराच्या सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाही. हे पाणी गटारीतून खानापूर शहरातील मालप्रभा नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे मलप्रभेचे पाणी दूषित होत आहे. या संदर्भात कुप्पटगिरी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी नागरपंचायतील तक्रार दिली …

Read More »

खानापूरात बुधवारी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; शहर भाजप कार्यकर्त्यांची बैठक

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई हे बुधवारी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता येथील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर खानापूर तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन सभेत संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या …

Read More »

नगरपंचायत स्थायी कमिटी चेअरमन यांची खानापूर फिल्टर हाऊसला भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराची वाढती लोकसंख्या तसेच वाढत्या वसाहती यामुळे खानापूर नगरपंचायला मलप्रभेतून पाणी पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी खानापूरातील नव्या पुला जवळील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसला भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे स्थायी समिती चेअरमन प्रकाश …

Read More »

गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, देसुर, केकेकोप्प गावच्या दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी धारवाड येथे नोंदविला आक्षेप

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी गर्लगुंजी, देसुर, नंदीहळ्ळी, केकेकोप्प आदी गावचे दोनशेहून अधिक शेतकरी सोमवारी दि. ७ रोजी धारवाड येथील केआयडीबीच्या विशेष जमिन अधिग्रहण अधिकारी वर्गाला शेतकऱ्यांनी वैयक्तिक आक्षेप नोंदविले. जवळपास १३०० एकर जमीन संपादित करणाऱ्या बेळगाव- धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या …

Read More »

परशराम मेलगे यांच्या मुख्याध्यापक पदी बढतीनिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार

  खानापूर : मराठा मंडळ हायस्कूल खानापूर येथील सहशिक्षक परशराम मेलगे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. मेलगे यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. सदर हायस्कूलच्या 2018-2019 च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे परशराम मेलगे यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तनुजा लाड हिने केले. यावेळी तनुजा लाड म्हणाली की, परशराम …

Read More »

खानापूर समितीच्या एकीसंदर्भात बुधवारी बैठक

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली. खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली. यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. …

Read More »