Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

घरफोड्यांना लवकर अटक करावी : धनश्री सरदेसाई

  खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांचा धुमाकूळ चालू आहे. गोरगरीब शेतकरी लोक घरात नसलेचे पाहून दिवसाढवळ्या घरफोड्यांचे सत्र चालू आहे. बेळगाव जिल्हा एसपी डॉ. संजीव पाटील यांना घरफोड्यांना आळा घालण्यासाठी व चोरांना जेरबंद करण्यासाठी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी …

Read More »

हाडलगा ते चापगांव रस्त्यांची दयनीय अवस्था

  खानापूर (तानाजी गोरल) चापगांव ते बेकवाड, खैरवाड, बिडीकडे जाण्यासाठी हाडलगा गावावरून जवळचा रस्ता असल्याने रहदारी वाढली आहे. गेले दोन-तीन महिने पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. तरी समस्त अधिकारक मंडळींनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून जनतेची गैरसोय दूर करावी अशी हाडलगा जनतेची मागणी आहे. फक्त निवडणूकेच्या …

Read More »

‘पेटीएम’ मॉडेलवर ‘पेसीएम’ पोस्टर व्हायरल

  भ्रष्टाचाराविरोधात क्यूआर कोडसह काँग्रेसचा प्रचार; भाजप, काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई बंगळूर : भाजप आणि काँग्रेसमध्ये क्यूआर कोडची लढाई सुरू झाली आहे. पेटीएमच्या मॉडेलवर तयार केलेले ‘पेसीएम’ पोस्टर्स शहराच्या अनेक भागात लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे चित्र असलेले हे पोस्टर्स बंगळुर शहरात ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्याने राज्य …

Read More »

विद्यार्थ्यांनी दिले बुलबुल पक्षाला जीवदान

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज सर्वत्र मोठ्या पदावर काम करत असून त्यांच्या कामा बरोबरच अनेक समाज उपयोगी कामाची जोड देऊन समाजाप्रती आपली काही देणे लागत असल्याचा उदात्त भावनेतून सर्वत्र कार्य करताना आपण पाहत असतो. महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असणारे आजी विद्यार्थी देखील काही कमी …

Read More »

भ्रष्टाचार संपविण्यासाठी निपाणीत आम आदमी : भास्करराव

निपाणीत शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशातील सर्वच पक्ष भ्रष्टाचारी बनले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा पक्ष दिल्लीत राज्य करत आहे. आता सर्वच नागरिकांना अनेक सोयी सुविधा पक्षातर्फे दिल्या जात आहेत. सरकारने कराचा सदुपयोग करून मोफत शिक्षण, आरोग्य वीज बिल अशा अनेक …

Read More »

संकेश्वर पालिकेत रस्ता नामकरण विषयावर जोरदार चर्चा…

  व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उमेश सहभागी संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत हिरण्यकेशी साखर कारखाना ते सोलापूर फाटा दरम्यानच्या जुन्या पी.बी. रोडला दिवंगत उमेश कत्ती मार्ग आणि पन्नास एकर जमीनीत साकारत असलेल्या निवासी योजनेला उमेश कत्ती नगर असे नामकरण करण्याच्या विषयावर सत्तारुढ आणि विरोधी नगरसेवकांत एकमत होऊ शकले नाही. …

Read More »

भाजपच्या वतीने जांबोटीत वृक्षारोपण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपच्या वतीने जांबोटी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळुरकर, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, …

Read More »

लम्पी रोगाची शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील शेतकरी बांधवाना अलिकडे जनावरांना नविन लम्पी रोगाची लक्षणे दिसत आहेत. लम्पी रोग सांसर्गिक रोग आहे. हा रोग झपाट्याने फैलावत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने अनेक जनावरे दगावण्याची शक्यता येत आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या जनावराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. …

Read More »

सोयाबीनची तांबेऱ्यांने वाट लागली…

  उत्पादन घटले, दरातही घसरण.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटलेले दिसत आहे. दरात देखील मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचे बंपर पीक हाती येणार अशी आशा बाळगली …

Read More »

निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… भावपूर्ण निरोपाने विसर्जन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे सोमवार दि. १९ रोजी रात्री १.१० वाजता हिरण्यकेशी नदीत निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. निलगार गणपतीची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत तासभर चाललेली दिसली. परंपरागत पद्धतीने विसर्जन.. संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार …

Read More »