Saturday , December 13 2025
Breaking News

कर्नाटक

आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा

डॉ. अरुण पाटील : मोहनलाल दोशी विद्यालयात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आयुष्यात कष्टाला महत्व देऊन प्रामाणिक प्रयत्न करावे . गुरुजन व पालकांसोबत नम्रपणे वागावे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्न करावे. विविध क्षेत्रात यशस्वी व्हावे.यशाने हुरळून न जाता समाजाशी बांधिलकी जपावी, असे मत डॉ. अरुण …

Read More »

खानापूर येथे आढळला संशयास्पद मृतदेह

  घातपात, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू? खानापूर : खानापूर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेरुळाजवळ कालव्यात शनिवारी (ता.10) अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर कोणतेही घाव नसले तरी सदृढ असलेला तरूण गुडघाभर पाण्यात पडून कसा मरू शकतो त्यामुळे नागरिकातून दबक्या आवाजातून संशय व्यक्त होत आहे. श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज …

Read More »

हिंमत असेल तर भाजपला रोखून दाखवा

बोम्मईंचे कॉंग्रेसला आव्हान, जनस्पदंन मेळाव्यातून भाजपचे शक्तीप्रदर्शन बंगळूर : दोड्डबळ्ळापूरमध्ये सुरू झालेला जनस्पंदन मेळाव्यात सामान्य जमतेने दाखविलेल्या प्रतिसादातून संपूर्ण कर्नाटकात कमळ पुन्हा फुलवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा, असे ते म्हणाले. भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या …

Read More »

खानापूर महेश पीयू काॅलेज शांतीनिकेतन खेळाडूंचे फूटबाॅल स्पर्धेत यश

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी शैक्षणिक संस्थेच्या खानापूर येथील महेश पीयू कॉलेज शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी विद्या भारती खेल परिषद धारवाड आयोजित फुटबॉल स्पर्धेत यश संपादन केले. त्यांची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली. नुकताच राष्ट्रोत्थान विद्या केंद्र, धारवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत महालक्ष्मी शैक्षणिक संस्था, खानापूरच्या शांतीनिकेतन महेश पदवीपूर्व महाविद्यालयाच्या …

Read More »

अमलझरी येथील रेणुका मंदिराला आर्थिक सहाय्य

निपाणी : निपाणी जवळच असलेल्या अमलझरी गावातील लोकवर्गणीतून बांधलेल्या श्रीरेणुका मंदिराच्या पुढील कामकाजासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत BC(R) ट्रस्ट निपाणी शाखेकडून 1,50,000 रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला. हा धनादेश चिकोडी जिल्हा निर्देशक टी. कृष्णा व निपाणी तालुका योजना अधिकारी श्री. जाफर अत्तार, निपाणी शाखा अधिकारी श्री. रामदास गौडा यांच्या …

Read More »

संकेश्वरात राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान मिळवून देण्याचे कार्य अनिल खानापूरे, सिध्दू अजण्णावर, बसवराज सारवाडी यांनी केले आहे. याविषयीची माहिती अशी परवा रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावासाठी धावणारा मोर खानापूरे यांच्या शेतवाडीतील विहिरीत कोसळला. विहिर काॅंक्रीटने बांधकाम केलेली असल्यामुळे मोराला विहिरीतून बाहेर पडता येईना. त्यामुळे रात्रभर मोराला …

Read More »

हुक्केरीसाठी रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा….

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभेसाठी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचा राजकीय वारसा पुढे खंबीरपणे चालविणेचे कार्य रमेश कत्ती निश्चितपणे करतील असा विश्वास लोकांतून व्यक्त केला जात आहे. राजकारणात‌ रमेश कत्ती हे डॅशिंग लिडर म्हणून ओळखले जातात. ते …

Read More »

वल्लभगडात कँडल मार्चने यु.के.ना श्रध्दांजली

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर आणि वल्लभडात उमेशअण्णा अमर रहेच्या जयघोषात हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना कॅंडल मार्चने श्रध्दांजली वाहण्यात आली. यु.के. अक्षरा सभोवतीच्या मेणबतीच्या प्रकाशात उमेश अण्णांच्या आठवणी जागविण्यात आल्या. हरगापूर आणि गडवासियांनी हातात पेटत्या मेणबत्ती घेऊन कॅंडल मार्चने कत्तींना …

Read More »

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीला केंद्रीय पथकाची भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

कोगनोळी परिसरात सोयाबीन कापणी, मळणीच्या कामाला गती

  कोगनोळी : परिसरात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी, मळणीच्या कामाला गती आली असून या कामात शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा लाभ घेत अनेक शेतकर्‍यांनी 9305 या जातीच्या सोयाबीन बियांची पेरणी केली होती. सोयाबीन पिकाच्या कापणी व मळणीचे …

Read More »