Saturday , April 18 2026
Breaking News

आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा

Spread the love
डॉ. अरुण पाटील : मोहनलाल दोशी विद्यालयात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आयुष्यात कष्टाला महत्व देऊन प्रामाणिक प्रयत्न करावे . गुरुजन व पालकांसोबत नम्रपणे वागावे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्न करावे. विविध क्षेत्रात यशस्वी व्हावे.यशाने हुरळून न जाता समाजाशी बांधिलकी जपावी, असे मत डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात  एन.एम.एम.एस व सारथी तसेच स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व निपाणी परिसरातील डॉ. अरुण पाटील बोलत होते.
मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी १२ लाख ५७ हजार ६०० इतकी शिष्यवृत्ती मिळविण्याचे सांगितले. आर. डी. देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एन एम एम एस परीक्षेत राष्ट्रीय स्तरावरील यादीत निवड झालेल्या धनश्री पोकले, आदर्शा पाटील, रोहिणी जाधव, पायल कुंभार, दीप्ती खाडे, दीपाली पाटील, प्रार्थना हवालदार, वैभव खवरे, प्रथमेश जगदाळे, आदिती हसोळे, प्रणाली पोवार, ऋतुजा कुंभार, निरंजन माने, अवधूत डवरी या विद्यार्थ्यांना मिळून ७ लाख २० हजार रुपयांची मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सारथी शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याबद्दल साहिल जाधव, उन्मेश शिंत्रे, अभिषेक यादव, शुभम पाटील, गुरुप्रसाद ठाणेकर, अथर्व पाटील, वैष्णवी ताटे, प्रीती नारे, प्रथमेश म्हाळुंकर, सुयश कळंत्रे, निरंजन खराडे, प्रणय पाटील,  स्वराज पाटील, अवधूत चौगुले, या विद्यार्थ्यांना एकूण ५ लाख ३७ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळवल्य बद्दलविद्यार्थी व पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार  मान्यवरांच्या हस्ते झाला.
स्काऊट गाईडमधून राज्य पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अनुराधा पाटील, तन्वी देसाई, मृणाली चराटी, सुप्रिया सुतार, अंजली डोणे, सानिका जगताप, श्वेता कुंभार, संचिता जामदार, ऋतुजा माळी, ऋतुजा जाधव, रोहिणी चौगुले, संचिता पाटील, पूनम जामदार या विद्यार्थिनींनी स्काऊट गाईडमधून राज्य पुरस्कार मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास एस. बी. पाटील, एस. एम. गोडबोले, आर. एस. भोसले,  शिक्षक प्रतिनिधी एस. एस. सांडगे, कर्मचारी प्रतिनिधी सज्जन कांबळे, उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना आर. डी. पाटील, एस. डी. तोडकर तर गुणवंत गाईडना यु. एम. सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. आर. डी. पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *