Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान….

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान मिळवून देण्याचे कार्य अनिल खानापूरे, सिध्दू अजण्णावर, बसवराज सारवाडी यांनी केले आहे. याविषयीची माहिती अशी परवा रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावासाठी धावणारा मोर खानापूरे यांच्या शेतवाडीतील विहिरीत कोसळला. विहिर काॅंक्रीटने बांधकाम केलेली असल्यामुळे मोराला विहिरीतून बाहेर पडता येईना. त्यामुळे रात्रभर मोराला विहिरीतील पाण्यात पोहत जीव वाचवावा लागला. सकाळी शेतावर गेलेल्या अनिल खानापूरे यांना विहिरीतील पाण्यावर मोर तरंगताना दिसून आला. त्यांनी लागलीच सिध्दू अजण्णावर, बसवराज सारवाडी यांना बोलावून घेऊन मोराला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. बऱ्याच प्रयत्नानंतर मोराला पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी मोराला पाण्याबाहेर काढून त्याचे पंख कापडाने पुसून काढले. पंख कोरडे होताच मोराने आकाशात भरारी घेतली. अनिल खानापूरे, सिध्दू अजण्णावर, बसवराज सारवाडी यांना राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान मिळवून दिल्याचा आनंद झाला.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *