निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११) द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, …
Read More »खानापूर आम आदमीच्यावतीने कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील याच्यावतीने कणकुंबी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी उपस्थित होते. बक्षिसाचे वितरक म्हणून खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी …
Read More »मुडेवाडी शाळेची इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम सुरू आहे. तालुक्यातील गर्लगुंजी येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची वर्गखोली शुक्रवारी रात्री कोसळली. ही घटना ताजी असतानाच मुडेवाडी (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री कोसळली. सुदैवाने रविवारी शाळेला सुट्टी होती त्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली …
Read More »निपाणी तालुक्यातील माणकापुरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
निपाणी : विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. अर्चना गजानन बाळशेट्टी या 35 वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. विहिरीवरील मोटारपंप संचाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अर्चनाला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या पाणी पात्राबरोबर वाहू लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या …
Read More »विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. सकाळपासूनच विठ्ठल कोळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक सभासद नागरिक यांनी गर्दी केली होती. येथील गर्ल हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल येथे विठ्ठल कोळेकर यांचा पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन …
Read More »राज्यात प्रथमच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एकसमान वेळापत्रक
बंगळूर : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण राज्यात लागू होण्यासाठी प्रथमच एकसमान वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. राज्यातील सर्व व्हीव्ही आणि महाविद्यालयांनी याचे सक्तीने पालन करावे, अशी सूचना उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी केली आहे. याबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यभरातील पदवी …
Read More »संकेश्वरात बकरी ईद उत्साहात साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) अमाप उत्साहात साजरी केली. तरणा पाऊस संततधार बरसत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची नमाज ईदगाह ऐवजी मशीदमध्ये पठण करावी लागली. सुन्नत जमातने ईदची नमाज सकाळी सात वाजता तर मोमीन (मेहदी) समाज बांधवांनी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता पठन केली. नमाज …
Read More »शहर परिसरात आषाढी एकादशी साजरी
दर्शनासाठी भाविकांची गर्दी : ठिकाणी खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात रविवारी (ता.१०) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली त्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच …
Read More »‘अंकुरम’ मध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा
चिमुकल्यांनी केल्या वेशभूषा : शाळेभोवती रिंगण सोहळा निपाणी (वार्ता) : अंगात पांढरे सदरे घातलेले विद्यार्थी, गळ्यात टाळ, विठ्ठल -रुक्मिणीची वेशभूषा, डोक्यावर तुळस, हातात भगवा पताका, विठू माऊलीचा जयघोष, शाळेभोवती रिंगण सोहळा अशा भक्तिमय वातावरणात येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी सादर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta