Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

पीयु अतिथी प्राध्यापकांच्या वेतनात १२ हजार रुपयापर्यंत वाढ

बंगळूर : कर्नाटकातील सरकारी पदवीपूर्व (पीयु) महाविद्यालयातील अतिथी व्याख्यात्यांच्या मानधनात सुधारणा केल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला असून, त्यांच्या मानधनात नऊ हजार रुपयावरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने सांगितले की, चालू वर्षात व्याख्यात्यांची कमतरता दूर करण्यासाठी तीन हजार ७०८ अतिथी व्याख्याते भरले जात आहेत. याबाबतची …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी २६ कोटी

बैठकीत विकास योजनावर चर्चा बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराचा २६ कोटी रूपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठक घेऊन चर्चा केली. विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या दालनात सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी, मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी अहवाल तयार …

Read More »

बकरी ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या …

Read More »

हिरण्यकेशीचं गंगा पूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज हिरण्यकेशी नदीला आलेल्या नवीन पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले. हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपचे सदस्य पुरोहित वामन पुराणिक यांनी हिरण्यकेशी गंगेचे विधिवत पूजन केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते स्विमिंग ग्रुपला प्रोत्साहन देणारे तमण्णा गाडवी …

Read More »

कौंदल येथील मराठी शाळेत वारूळ, सापाची राहुटी; विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची बिकट परिस्थिती असतानाच कौंदल (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळा इमारतीत वारूळ उभारल्याने तसेच वर्गखोलीत सापाचे दर्शन झाल्याने विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गात आणि पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यांनी कौंदल शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. …

Read More »

संकेश्वर येथील जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरल्याचे निजलिंगप्पा दड्डी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम करतांना दुभाजक ऐवजी रस्त्याच्या मधोमध कसेबसे पेव्हरचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने घसरुन येथे अपघात घडत आहेत. सदर रस्ता कामांसाठी …

Read More »

आप्पाचीवाडीत आढळला मृतदेह

कोगनोळी : आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात एकाचा मृतदेह आढळला. राजेंद्र कृष्णात चव्हाण (वय – ४२, रा. आडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. राजेंद्र चव्हाण हा शनिवारी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात झोपलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून …

Read More »

गर्लगुंजी-नंदीहळ्ळी रस्त्याची दुरावस्था

गर्लगुंजी (सागर पांडुचे) : गर्लगुंजी ते नंदीहळ्ळी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या …

Read More »

बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई द्यावी

मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना सूचना बेंगळुर : राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आधी बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई देण्याच्या सूचना राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बंगळुरात बुधवारी अतिवृष्टीने होणार्‍या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना काय सूचना केल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, या …

Read More »

असोगा मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश सावंत

खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड नुकताच करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य सुरेश सुळकर, कृष्णाबाई गिरी, शांताबाई मादार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. यांनी प्रास्ताविक करून उपस्थित …

Read More »