Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे

संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी …

Read More »

निपाणी येथे कडकडीत बंद, अभूतपूर्व मूकमोर्चा

निपाणी तालुक्यातील अनेक गावात बंद : पुतळा विटंबनेचा निषेध निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबने निषेधार्थ येथील सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी सोमवारी (ता. 20) शहरात मूकमोर्चा काढला. त्यामध्ये शहरातील दहा हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर दोन्ही घटनेतील दोषींवर कारवाई करण्याच्या …

Read More »

हलशी येथे बसवाण्णा महाराजांच्या फोटोची विटंबना

खानापूर (वार्ता) : बेळगाव : कर्नाटकाची राजधानी बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अनगोळातील वीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हळूहळू थंड होत असतानाच खानापूरात जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोची आणि लाल-पिवळ्या ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी गावात लाल-पिवळा जाळून …

Read More »

राज्याच्या हिताविरोधात असणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करणार : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव (वार्ता) : बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता मोजवण्याचे काम म. ए. समिती करत आहे. म. ए. समिती राज्याच्या विरोधात कारवाया करत आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या हिताचा विरोधात काम करणार्‍यांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज …

Read More »

हेब्बाळच्या डॅममध्ये पडून महिलेचा मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) गावची मुलगी व गणेबैल गावची सुन श्रीमती लक्ष्मी मल्हारी गेजपतकर (वय 34) हिचा हेब्बाळच्या डॅममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. 20 रोजी घडली. हेब्बाळ येथील मारूती कल्लापा गुरव यांची कन्या असून तिचे सासर गणेबैल आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा …

Read More »

मास्केनट्टीत युवकाचा तळ्यात पडून मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : मास्केनट्टीत (ता.खानापूर) येथील जानु विठ्ठल जंगले (वय १८) याचा मास्केनट्टी गावापासुन जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात रविवारी दि. १९ रोजी दुपारी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मास्केनट्टी गावचा युवक जानु विठ्ठल जंगले मानसिक दृष्ट्या कुमकवत होता. तो अचानक तळ्याकडे गेल्याने तो …

Read More »

विटंबनेच्या निषेधार्थ खानापूरात १०० टक्के बंद यशस्वी

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटकाची राजधानी बेंगळुर येथे छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची विटंबना करून महाराजांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ रविवारी दि. १९ रोजी खानापूर बंदची हाक दिली होती. यावेळी सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील दुकाने व्यापारी वर्गाने बंद करून पाठींबा दर्शविला. येथील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात तालुक्यातील सर्वपक्षिय संघटनांनी बंदच्या निषेधार्थ शहरातुन फेरी काढण्यात आली. …

Read More »

ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. के. सुधाकर

बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. संपूर्ण देशात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात कर्नाटक राज्य अग्रस्थानी आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. अंकली या गावात नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव …

Read More »

खानापूरात सागर पानशॉपमध्ये चोरी, 15 हजाराचा माल लंपास

  खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील बेळगाव-पणजी महामार्गावरील होसमणी पेट्रोल पंपला लागून असलेल्या प्रभाकर चिनवाल यांच्या सागर पानशॉपमध्ये शुक्रवारी दि. 17 रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी सागर पानशॉपच्या मागील बाजुस पानशॉपचा लोखंडी पत्रा कापून आत शिरकाव केला. त्यानंतर 6 ते 7 हजार रूपये किमतीची सिगारेटची बंडल, 3 …

Read More »

रयत संघटनेच्या मोर्चाला अखेर यश

राजू पोवार : मंगळवारी होणार मंत्री महोदयांशी बैठक निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करावे, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या पिकांना भरपाई मिळावी, शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाला भरपाई दिली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव …

Read More »