Sunday , July 26 2026
Breaking News

भाई थोडा संभालके….

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी बी रोड चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. रस्ता करताना चर बुजविण्याचे काम कसे-बसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना चौपदरी रस्त्यावरुन सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. येथील पोस्ट कार्यालय नजिकच्या जुना पी. बी. रोडवर वाहनधारकांना सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. खासगी कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांना येथे जबर धक्का सहन करावा लागत असल्याने ते चालकाला भाई जरा संभालके. असेच कांहीसे सांगताना दिसताहेत. येथे रस्त्यावर खड्डा असल्याची कल्पना नसलेल्या वाहनधारकांना जबर धक्का सहन करावा लागत आहे. सदर रस्ता निर्माणचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी इकडे लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *