Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच धर्मांतर विरोधी कायदा : सिद्धरामय्या

बेळगाव (वार्ता) : आपले अपयश झाकून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच भाजप धर्मांतर विरोधी कायदा आणू पहात आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला. बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना धर्मांतर बंदी कायद्याबाबतच्या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले, हा कायदा गरजेचं आहे का? भाजप लोकांचे ध्यान इतरत्र वळवण्यासाठी हा कायदा आणत आहे. जबरदस्तीने धर्मांतर …

Read More »

वादग्रस्त विधानावरून आम. रमेशकुमार यांनी मागितली माफी!

बेळगाव (वार्ता) : सुवर्णसौधमधील अधिवेशनात काल वादग्रस्त विधान केलेल्या माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आ. के. आर. रमेशकुमार यांनी अखेर माफी मागितली. शुक्रवारी सायंकाळी विधानसभेत रमेशकुमार यांनी बलात्कारावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली. सर्वपक्षीयांनीही टीका केली. आपल्या विधानावरून आता रणकंदन माजणार हे लक्षात आल्याने रमेशकुमार …

Read More »

सौंदलगाजवळ अपघातात दोन ठार

कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या सौंदलगा जवळच मोटर सायकल व कार अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार क्रमांक एमएच 03 सीबी 4915 …

Read More »

जमीन बळकावल्याच्या चौकशीसाठी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

बेळगाव : एका मंत्री आणि भाजप आमदाराच्या जमीन बळकावल्याच्या आरोपांवर आज शुक्रवारी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. यावेळी सिद्धरामय्या यांच्या मागणीला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी एकच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभापती विश्वनाथ कागेरी हेगडे यांनी, आजच्या …

Read More »

1971 युद्धाने देशाला बळकट करण्यासाठी नवी प्रेरणा दिली : मुख्यमंत्री बोम्माई

शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली; शौर्य विजेत्यांच्या अनुदानात वाढ बेळगाव (वार्ता) : 1971 साले झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. त्याला 50 वर्षे पूर्ण होत असताना, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावातील मराठी लाइट इन्फंट्री सेंटरच्या प्रांगणात गुरुवारी (दि. 16) आयोजित ’विजय दिवस’ …

Read More »

पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील

मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात …

Read More »

निपाणीत भुरट्या चोर्‍यांचे प्रमाणही वाढले

पोलीस खाते सुस्तच : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या चोर्‍यांबरोबर भुरट्या चोर्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन दिवसात संभाजीनगर परिसरात पाच-सहा ठिकाणी चोर्‍या झाल्याचे प्रकार घडले. यात कोणताच मोठा ऐवज लंपास झालेला नसला तरी त्यामुळे चोर्‍यांचे वाढलेले प्रमाण मात्र चिंताजनक ठरले आहे. त्यामुळे …

Read More »

देशाचा अभिमान बाळगण्याचे ध्येय ठेवा

निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …

Read More »

कर्नाटकात लवकरच मराठा समाज विकास महामंडळ पदाधिकार्‍यांची निवड

मंत्री आर. अशोक यांची माहिती बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे. दरम्यान अद्यापही या महामंडळावर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड झालेली नाही. यासंदर्भात आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आज गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी …

Read More »

उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य नको ; कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश

बंगळूर : उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य करण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 16) राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020च्या कथित अंमलबजावणीच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये कन्नड भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य …

Read More »