Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

मलप्रभा साखर कारखान्याच्या चौकशीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना विविध कारणांनी डबघाईत आला असताना सन् 2020-21 सालातील गळीत हंगामातील साखरेचा उतारा कमी दाखवून कारखाना संचालक मंडळाने 18 हजार क्विंटल साखर लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी वर्गाने वेळीच तपास लावून साखर सील बंद केली आहे. ही गंभीर बाब आहे. …

Read More »

अमर पोवार व शुभांगी पोवार यांना क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार जाहीर

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार व संचालिका शुभांगी पोवार यांना कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र नुकतेच माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते त्यांना …

Read More »

अहो कमालच… दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे!

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : निपाणीच्या अविनाश मानेचे यश निपाणी : अनेक बालकांमध्ये विविध कौशल्य भरलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासाला चालना दिल्यास नक्कीच यशाला गवसणी घालण्यास मदत होते. असाच निपाणी येथील 3 वर्षीय बालक अवनीश माने याने केवळ दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे सांगितली. त्याची इंडिया बुक ऑफ …

Read More »

निपाणीत प्रभाग क्रमांक 31मध्ये समस्यांचा डोंगर

नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन : खराब रस्त्यासह पथदीप नसल्याने अडचण निपाणी : येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलभूत सुविधा देण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे सोमवारी येथील नागरिकांनी शासन नियुक्त नगरसेवक दत्तात्रेय जोत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 31मधील …

Read More »

जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन

राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज …

Read More »

कर्नाटक प्रवेशाच्या जाचक अटीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट

सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात …

Read More »

खानापूरात बॅडमिटन स्पर्धा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील बॅडमिंटन असोसिएशन कोर्ट येथे फ्रेंड्स बॅडमिंटन क्लब यांच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिल्या गटात ४० वर्षाखालील तर दुसरा गटात ४० वर्षा गटावरील गटात तर महिलांसाठी ओपन गट अशा विविध गटात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेतील विजयी स्पर्धक खालील प्रमाणे मुलीच्या गटात …

Read More »

शहर विकास आघाडी-भाजपमध्येच थेट लढत

बोरगाव नगरपंचायत निवडणूक : मंत्री जोल्ले, उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर निपाणी : बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुक 27 डिसेंबरला होणार असून या अनुषंगाने शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायत ताब्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून शहर विकास आघाडी …

Read More »

स्त्रीभ्रूण हत्येबाबत समाजात जनजागृती व्हावी

संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल …

Read More »

तंत्रज्ञानामुळे नवीन शैली हद्दपार होण्याची भीती

विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील …

Read More »