Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

विजापूर येथे महिलेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

  विजापूर : मानसिक तणावातून महिलेने तिच्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील हंदिनागुर गावात घडली. 32 वर्षीय अव्वम्मा श्रीशैल गुब्बेवाड असे आत्महत्या केलेल्या या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अव्वम्मा …

Read More »

कस्तुरीरंगन अहवालाने तालुक्यातील 62 गावावर येणार निर्बंध

  कस्तुरीरंगन अहवालाला विरोध करणार : प्रमोद कोचेरी खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील जवळपास 62 गावाचा कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. याला विरोध करत येत्या 60 दिवसात तालुक्यातील 62 गावाचा संपर्क घेऊन, नागरिकांशी चर्चा करून नागरिकांसह खानापूर तालुका भाजपच्यावतीने केंद्र सरकारला हरकती देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार …

Read More »

’मॉडर्न’मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धाच्या माध्यमातून आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्नेहा घाटगे होत्या तर मुख्य अतिथी म्हणून वसंत शंगोळे -गुरुजी, तबलावादक नसीर मुल्ला, हेमंती ओबले, संदिप इंगवले यांची उपस्थिती होती. आषाढी …

Read More »

भाटनांगनूरमध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

  निपाणी (वार्ता) : भाटनांगनूर येथील मठामध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नवीन मूर्तीची नागनाथ -हालसिध्दनाथ महाराज मठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चैतन्य महाराज व चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा झाली. …

Read More »

संकेश्वरात उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे खास बेंदूरनिमित्य आयोजित हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय बैलजोडी उत्कृष्ट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. बळीराजा आपल्या पोशिंदा बैलांचा बैलपोळा सण पावसाची पर्वा न करता अमाप उत्साही वातावरणात साजरा करताना दिसला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट बैलजोडींची गावातील प्रमुख मार्गे सवाद्य मिरवणूक …

Read More »

मदत, बचावकार्यासाठी निधीची कमतरता नाही

मुख्यमंत्री बोम्मई, निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलणार बंगळूर : राज्यातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात असताना या संकटाच्या वेळी कर्नाटक सरकार लोकांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. मदत आणि बचावकार्यासाठी निधीची कमतरता नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलून नवीन लोकांना संधी देण्यात येणार …

Read More »

वडिलांच्या वाढदिवसादिवशी मुलाची आत्महत्या

  खानापूर : वडिलांच्या वाढदिवसा दिवशीच मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथे घडली. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथील आंबेडकर गल्लीतील प्रथमेश राजू कोळी (17) याने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी नवीन मोबाईल लवकरच घेऊ सध्या जुना …

Read More »

चातुर्मास निमित्त 14 रोजी बोरगावात कलश स्थापना

  जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे …

Read More »

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा

निपाणी (वार्ता) : येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल चमूंचा वारकरी दिंडी सोहळा झाला. या कार्यक्रमात नर्सरी छोटा गट, मोठा गट व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारात बाल वारकरी विठ्ठल रुक्माईच्या समवेत दिंडी …

Read More »

कालमणी व्हाया आमटे बससेवा सुरू होणार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिजंगल भागातील आमटे गावातून बससेवेने या भागातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी शाळा, कॉलेज शिक्षणासाठी खानापूरला नियमित ये-जा करतात. मात्र अलीकडे बससेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना खासगी ट्रॅक्स, टॅपो, दुचाकीवरून खानापूरला ये-जा करावे लागते. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्या कॉलेजच्या मुलीना प्रवास करणे धोक्याचे झाले …

Read More »