Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

अन् हिरण्यकेशी उलटी वाहू लागली….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-नांगनूर भागातील नागरिकांना आज प्रथमच आगळं-वेगळं असे कांहीतरी पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहताना दिसला. हे आगळे वेगळे अन् अफलातूनची करामत पहाण्यासाठी लोक भरपावसात गोटूर बांधाऱ्यावर जमा झालेले दिसले संकेश्वरात आज पाऊस बऱ्यापैकी कोसळला पण कमतनुरला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कमतनूर ओढ्याच्या पाण्याने …

Read More »

‘अग्निपथ’ विरोधात निपाणीत युवकांचा आक्रोश मोर्चा

तगडा पोलिस बंदोबस्त : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन निपाणी (वार्ता) : संरक्षणासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात संरचात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्वावर राबवणं गरजेचे आहे. ‘अग्निपथ योजने’त सहभागी होणाऱ्या युवकाना कुठलेही कायमस्वरूपी काम नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर लाभ नाही. त्यामुळे निपाणी भागातील शेकडो युवकांनी …

Read More »

संकेश्वरात बळीराजा खूश हुआ…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात पावसा अभावी खरीप पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळा लावून बसला होता. आज पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी (बळीराजा) खूश झालेला दिसत आहे. संकेश्वर परिसरात तीन तास बरसलेल्या दमदार पावसाने शेतशिवारात पाणीच-पाणी झालेले दृश्य पहावयास मिळत आहे. मृग जाता-जाता बरसणार असा अंदाज हवामान …

Read More »

हदनाळ-मत्तीवडे रस्त्यावर शेतकऱ्यांचे अतिक्रमण

कारवाई करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ ते मत्तीवडे या सीमाभागातील ६ किलोमीटरच्या महाराष्ट्र-कर्नाटक रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीतील शेंडूर (ता. कागल) येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी सोईचा असणारा हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. सदर शेतकऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हदनाळकरांनी …

Read More »

बेळगाव, खानापूरातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगांव : दुरुस्ती व विजवाहिन्या तपासणीच्या कारणास्तव बेळगावसह खानापूर तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा रविवारी दि. 19 रोजी खंडित होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. बेळगाव तालुक्यातील हालगा, बस्तवाड, शगनमट्टी, कमकारहट्टी, कोळीकोप्प, बडेकोळमठ, मास्तमर्डी बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी …

Read More »

बारावी परीक्षेचा निकाल 61.88 टक्के

दक्षिण कन्नड प्रथम; बेळगावचा निकाल 59.88 टक्के बेंगळुरू : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण मंडळाने घेतलेल्या 2021-22च्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालात दक्षिण कन्नड जिल्हा शेकडा 88.02 सह राज्यात प्रथम आला असून त्याच्याच शेजारचा उडुपी जिल्हा द्वितीय आला आहे. विजापूर जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे. गेल्या एप्रिल 23 …

Read More »

केंद्राने ‘अग्निपथ’ रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या

हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या …

Read More »

अग्निपथ विरोधात खानापूरात तरूणाईचा आक्रोश मोर्चा

आमदार डॉ. अंजलीताईंची तरूणाईला साथ : मोर्चात सहभागी खानापूर : आज संपूर्ण भारतात तरूण मुले मोदी सरकार विरोधात उभी ठाकली असून त्याचा प्रत्यय आज खानापूरात आला. तमाम तरूण मंडळी, होतकरू, आर्मीमध्ये भरतीसाठी मेहनत करणारे सर्व तरुण, माजी निवृत्त सैनिक तसेच आमदार अंजलीताई निंबाळकर आज सकाळी मलप्रभा ग्राऊंडवर जमले. तिथून मोदी …

Read More »

पाठ्य पुस्तकातील समस्या मार्गी लावा : राजेंद्र पवार वड्डर

शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे …

Read More »

कणगला लाईफ केअरतर्फे पुंडलिक करिगार यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला एच.एल.एल. कंपनीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त पुंडलिक करिगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणगला एच.एल.एल कंपनीत पुंडलिक करिगार हे ३५ वर्षे सिनियर बाॅयलर ऑपरेटर म्हणून सेवा बजावून निवृत झाले आहेत. सेवानिवृतीबद्दल पुंडलिक करिगार यांचा एच.एल.एल. कंपनीचे युनिट प्रमुख के.नरेश, एच.आर.चे विरेंद्र सर यांच्या हस्ते सत्कार करून …

Read More »