Monday , September 21 2026
Breaking News

माडीगुंजी श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ

Spread the love

खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि आणी दुपारी ठीक 2.00 वा. श्री माऊली देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक व मंदिरास प्रदक्षिणा होतील. नंतर बैलजोड्या फिरवीने त्यानंतर श्रीमान शामसुंदर मोहनराव केशकामत, गुंजी यांच्याकडून तीर्थप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी मानकर्‍यांकडून ओट्या भरणे, इंगळ्या नाहने तसेच रात्री 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल.
गुरुवार दि. 06-10-2022 रोजी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडने इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत व भाविकांच्या वतीने दु. 1.00 वा. महाप्रसाद होईल. तसेच सायंकाळी 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल. आणि रात्री 10.00 वा सोशल फौंडेशन गुंजी पुरस्कृत व चव्हाटा नाट्य मंडळ आयोजित डाकू संग्राम हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा.
शुक्रवार दि. 07-10-2022 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडने इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार. व सायंकाळी 8.00 वा. शेजारती व प्रसाद होईल.
शनिवार दि. 08-10-2022 रोजी 8.00 वाजल्यापासून इंगळ्या नाहने, देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार व सायंकाळी 5.00 वा. श्री माऊली देवीस महानैवेद्य व देवी भंडारण्याचे गार्‍हाणे होऊन या उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *