Thursday , June 4 2026
Breaking News

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांबाबत शहर देवस्थान कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार अ‍ॅड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत बैठक पार पडली.
यावेळी बोलताना आमदार म्हणाले की, कर्नाटकात म्हैसूर नंतर बेळगाव शहरात दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रशासनाच्या सहकार्याने हा उत्सव साजरा केला जात असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना उत्सवाचे निमंत्रण देण्याबरोबरच उद्भवणार्‍या समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीप्रसंगी विजयादशमीच्या पालखी मिरवणुकी दरम्यान सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात विशेष करून लाईटची व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजवणे वगैरे कामे केली जावीत. तसेच पोलीस यंत्रणा राबविली जावी अशी विनंती करण्यात आली. तेंव्हा जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ मनपा आयुक्तांशी संपर्क साधून 5 ऑक्टोबर पूर्वी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी दिली.
शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी यावेळी बोलताना शहर देवस्थान मंडळ आणि बेळगाव आतील चव्हाण -पाटील परिवारातर्फे 5 ऑक्टोबर रोजी शस्त्र पूजा होणार आहे. चव्हाण गल्लीचा नंदी शिलंगणावर आल्यानंतर दसरा उत्सव पार पडणार आहे.
याप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, सुनील जाधव, प्रा. आनंद आपटेकर, परशराम माळी, लक्ष्मण किल्लेकर आदी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *