Sunday , September 8 2024
Breaking News

देश/विदेश

विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक आज जाहीर होणार

  मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आज शुक्रवारी विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तारखा जाहीर करणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करेल, असे वृत्त …

Read More »

बिहारमध्ये सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

  पाटणा : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात …

Read More »

बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंसाचार : दोन गटांत झालेल्या हाणामारीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू

  ढाका : बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीत तब्बल १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांग्लादेशात पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर …

Read More »

डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू

  पटणा : कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा धक्का लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना बिहारच्या वैशालीनगर जिल्ह्यात रविवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, कालू कुमार, आशू कुमार, चंदन …

Read More »

मध्यप्रदेशमध्ये मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू

  रिवा : श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी १० ते १५ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळून ९ मुलांचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. …

Read More »

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी; अनेक जण बेपत्ता

  शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाडमध्ये ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना झाली आहे. ढगफुटीमुळे अनेक जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम, पोलीस तसेच बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पुरामुळे अनेक रस्ते बंद झाल्याने बचाव यंत्रणांना सर्व उपकरणांसह दोन किमीवर चालत जावे …

Read More »

देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

  मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून कायमचे दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते. जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू …

Read More »

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार, मृतांचा आकडा १४३ वर

  वायनाड : केरळच्या वाडनाड येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने ४ गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही २०० पेक्षा अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरूच …

Read More »

वायनाडमध्ये भूस्खलन; १९ जणांचा मृत्यू

  वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भूस्खलनात १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत २ लहान मुलांसहित १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे ४.१० वाजता …

Read More »

तब्बल 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्याचा दावा!

  नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. अमझद …

Read More »