Sunday , September 20 2026
Breaking News

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन

Spread the love

 

मुंबई : मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. आज दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ‘हम साथ साथ है’, ‘मै हूँ ना’ ते टीव्हीवरील ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. उद्या २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सतीश शाह यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. किडनी फेल झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *