Saturday , September 21 2024
Breaking News

देश/विदेश

कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म

  नवी दिल्ली : नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी चार बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नामिबियातून (दक्षिण आफ्रिका) १७ सप्टेंबर २०२२ …

Read More »

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव? विरोधकांसोबत पक्षपातीपणाचा आरोप

  नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तशा हालचाली विरोधी पक्षाच्या गोटात सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व निलंबित करणे आणि सभागृहात विरोधकांसोबत पक्षपाती करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष सोमवारी अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने राहुल …

Read More »

मेक्‍सिकोतील स्‍थलांतरित सुविधा केंद्रात अग्‍नितांडव; ३९ जणांचा मृत्‍यू, २९ गंभीर

  अमेरिकेतील मेक्‍सिकोमधील स्‍थलांतरित सुविधा केंद्राला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३६ स्थलांतरितांचा होरपळून मृत्‍यू तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्‍थेने दिले आहे. टेक्सासमधील एल पासोजवळ असलेल्या सिउदाद जुआरेझ येथील केंद्रात सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. अमेरिकेत येणार्‍या स्थलांतरितांसाठी उत्तर मेक्‍सिकोमध्‍ये स्‍थलांतरीत सुविधा केंद्र …

Read More »

आता 30 जूनपर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार

  मुंबई : सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे …

Read More »

राहुल गांधी यापुढं सावरकरांवर टीका करणार नाहीत, ठाकरेंच्या दबावामुळं घेतला निर्णय

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं चांगलच वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हटलं आहे. दरम्यान, काल (27 मार्च) दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून …

Read More »

खासदारकीनंतर आता ‘सरकारी निवारा’ही जाणार; राहुल गांधी यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, …

Read More »

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली ​आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात …

Read More »

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

  नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली …

Read More »

नितीन गडकरी यांना पुन्हा हिंडलगा कारागृहातून धमकी

  मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन …

Read More »

पीएफआय, सहयोगी संस्थांवरील बंदी योग्य; युएपीए लवाद

  नवी दिल्ली : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण …

Read More »