Sunday , July 26 2026
Breaking News

“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

Spread the love

 

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. कॅनडामध्ये झालेल्या या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. आता भारतानं कॅनडाला भारतातील त्यांच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.

एकीकडे कॅनडा निराधार आरोप करत असल्याची भूमिका भारतानं सातत्याने मांडली असून या आरोपांच्या समर्थनार्थ सबळ पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आता भारतानं मोठा निर्णय घेतला असून कॅनडाला भारतातील त्यांच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवण्यास सांगण्यात आलं आहे.

कॅनडाचे भारतात एकूण ६२ अधिकारी
कॅनडाचे भारतात एकूण ६२ राजनैतिक अधिकारी आहेत. त्यापैकी ४१ अधिकारी कॅनडानं माघारी बोलवावेत अशी भूमिका भारतानं मांडली आहे. त्यामुळे फक्त २१ कॅनेडियन अधिकाऱ्यांनाच भारतात राहण्याची परवानगी असेल. जर यावर अंमलबजावणी झाली नाही, तर हे २१ अधिकारी वगळता उरलेल्या ४१ अधिकाऱ्यांचं राजनैतिक संरक्षण १० ऑक्टोबरनंतर काढण्यात येईल, असंही भारतानं स्पष्ट केल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *