Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : जिव्हाळा ही संस्था महिलांनी स्थापन केलेली आहे त्यामुळे संस्थेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग आहे. या संस्थेतर्फे मोफत रुग्णवाहिका, शववाहिका, शवदहन सेवा, स्वच्छता अभियान, अश्या विविध सेवा पुरविल्या जातात.आज जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून संस्थेला हातभार लावलेल्या देणगीदारांना आमंत्रित करण्यात आले …

Read More »

शहरातील सहकारी बँकांकडून म. ए. समिती आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत

बेळगाव : म. ए. समितीच्या कोव्हिड आयसोलेशन सेंटरला बेळगाव शहरातील विविध सहकारी बँकानी आर्थिक मदत केली. तुकाराम बँकेने एकवीस हजार, मराठा बँकेने पंचवीस हजार आणि पायोनियर अर्बन बँकेने पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तुकाराम को. ऑप बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी मदतनिधीचा धनादेश मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केला. …

Read More »

विजया अर्थो ’म. फुले जन आरोग्य सेवा’ देण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. रवी पाटील

सुरुते ग्रामस्थांना कार्ड व फ्री बॉडी चेकअप कॅम्प कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : महाराष्ट्रातील विशेषत: चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी व दोडामार्ग या बेळगाव (कर्नाटक) नजीकच्या तालुक्यातील रुग्णांना शासकीय लाभ मिळावा. यासाठी विजया अर्थो अँड ट्रामा केअर सेंटर (VOTC) बेळगाव येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील …

Read More »

खानापूर युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण करण्यात आले.मास्क वितरणावेळी सीमालढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच यापुढे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.गावातील सर्व नागरिकांना …

Read More »

लोंढ्यात सापडलेल्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा ता. खानापूर येथे ३ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस इसमाला खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यानंतर इसमाच्या मृत्यूची ओळख पटविण्यासाठी बेळगाव येथील शवगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पोलिसांनी बेवारस मृत्यूदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस …

Read More »

चक्क 366 किलो गांजा पोलिसांनी जाळला

बेळगाव : बेळगाव शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. 77 घटनांमध्ये जप्त केलेला हा गांजा कडोली गावाजवळील गुंजेनहट्टीजवळ जाळण्यात आला. जप्त गांजा जाळण्यासाठी जेसीबीने खड्डा खणला आणि त्यात तो 366 किलो कोरडा गांजा जाळला.बेळगाव शहर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी सीआर …

Read More »

अथणीत पोलिसांची धडक कारवाई; दहा अट्टल दरोडेखोरांना केलं जेरबंद

अथणी (बेळगाव) : अथणी, कागवाड, रायबाग, हारुगेरी व जमखंडी तालुक्यात विविध ठिकाणी दरोडा टाकलेल्या दहा अट्टल दरोडेखोरांच्या टोळीस अथणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 11) जेरबंद केले. त्यांच्याकडून 4.70 लाखाचा ऐवजही जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, अनेक दिवसांपासून या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे पडले होते. अथणी तालुक्यातील रेडरहट्टी व रायबाग …

Read More »

विणकरांसाठी पॅकेज मंजूरमुळे मंत्री पाटील यांचा अथणी येथे सत्कार

निपाणी : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडले आहेत. कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक विणकरांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत होती. यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ३५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे व प्रत्येक विणकरांना ३ हजार रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग …

Read More »

खानापूरच्या दुर्गम भागात वन टच फौंडेशनतर्फे मदत

खानापूर : गोरगरीब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करण्यात अग्रेसर असलेल्या बेळगावच्या वन टच फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड, गवळीवाडा या दुर्लक्षित खेडेगावांमध्ये ‘एक हात मदतीचा’ ब्रीदवाक्याला अनुसरून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जूना गुडसशेड रोड बेळगाव वन टच फौंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेळगाव पासून 55 कि. …

Read More »

शनिवार, रविवार कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; हे राहणार सुरु, हे बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान ठराविक वेळेत सुरू असणारे खेळ, चित्रीकरण, दुकाने, व्यायामशाळा, ब्युटी पार्लरस, स्पा, केशकर्तनालय, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलिंग शनिवार आणि रविवारी बंद राहतील. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने …

Read More »