Wednesday , November 29 2023

बेळगाव

कॅपिटल वन एकांकिका जाहीर; 3 व 4 फेब्रुवारीला होणार स्पर्धा

  बेळगाव : सहकार क्षेत्रातउत्तरोत्तर प्रगती साध्य करीत असलेल्या कॅपिटल वन संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एकांकिका स्पर्धा – 2024 जाहीर झाल्या आहेत. विविध पृथ्यकरणाच्या आधारावर वर्षानुवर्षे या स्पर्धा पारदर्शक व लोकप्रिय होत असून मागील वर्षाप्रमाणेच नविन स्वरुपात व सुधारीत नियमावलींच्या अधारावरच यंदाची स्पर्धा आंतरराज्य व बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म. ए. समितीचा महामेळाव्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ३० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे होणार आहे. या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, मराठी …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समितीच्या बैठकीत निर्धार!

  बेळगाव : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यात सहभागी होईल, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Read More »

वैयक्तिक वादाला भाजपकडून राजकीय रंग : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करून सोडल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे ही भाजपची जुनी सवय आहे. नगरसेवक हाणामारी प्रकरणाला काँग्रेस- भाजप असा …

Read More »

पाककलेत बादशहाची संगत, महिलांच्या कवितेला आली रंगत

  बेळगाव : तारांगण व बादशाह मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील महिलांसाठी पाककला स्पर्धा तसेच काव्यवाचन मैफल अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन तारांगणच्या मुख्य संचालिका अरुणा गोजे पाटील यांनी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावमधील क्रीडा क्षेत्रातील अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते. त्याचबरोबर बेळगाव व हुबळी …

Read More »

उत्तर, दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव बुधवार दि. २९ रोजी शहराच्या उत्तर व दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत राणी चन्नम्मानगर, सुभाषचंद्रनगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वझे गल्ली, वड्डर छावणी, गणेशपेठ, कुलकर्णी …

Read More »

“त्या” दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करा; सुजित मुळगुंद यांची प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार

  बेळगाव : गोवावेस येथील खाऊ कट्ट्याच्या दुकानाचा मुद्दा चांगलाच रंगला आहे. वादग्रस्त ठरलेल्या खाऊ कट्ट्यासंदर्भात असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान वार्ड क्रमांक 23 चे नगरसेवक जयंत जाधव तसेच वार्ड क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार या …

Read More »

तीन आंतरराज्य दुचाकी चोरांना अटक; 14 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगावातील खडेबाजार पोलिसांना तीन आंतरराज्य मोटरसायकल चोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. मोटारसायकल चोरीस गेल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी तीन आंतरराज्य चोरांना अटक केली. महेश निंगाप्पा (23), अमीर बाबू इळगी (19) आणि प्रशांत गोपाळ मोरे (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे …

Read More »

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ खेलोत्सवाला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी आणि सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था पुरस्कृत खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली. यावेळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे होते. ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांच्या …

Read More »

भाजप नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक

  बेळगाव : अखेर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या आंदोलनाला यश आले असून प्रभाग क्रमांक 42 चे भाजप नगरसेवक अभिजीत जवळकर यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. भाग्यनगर येथे घरावर मोबाईल टॉवर बसवण्याच्या वादातून गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि स्थानिक …

Read More »