Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

जिमखाना क्लब गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणारा कारचालक अटकेत

  बेळगाव : शहरातील कॅम्प परिसरातील जिमखाना रम्मी क्लबमध्ये रौडीशीटर सुरेश जालगार याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपींना घटनास्थळी आणणाऱ्या कारचालकाला अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात नेण्यात आले. पुढे …

Read More »

एसआयआर फॉर्म मराठीत उपलब्ध करून द्या; खासदार अरविंद सावंत यांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

  बेळगाव : कर्नाटकातील बेळगावसह मराठी भाषिक अल्पसंख्याक भागांतील मतदारांसाठी विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचे अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात सावंत …

Read More »

मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशनच्या बैठकीत राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन

बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्या वतीने शनिवारी अंजनेय नगर येथील बास जिम व्यायामशाळेत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राज्यभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीला कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोले प्रमुख उपस्थित होते. …

Read More »

पाण्यात बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यात सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाला यश

  बेळगाव : गोकाक परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीच्या आधारे सोशल वर्कर रेस्क्यू टीम, एसडीआरएफ (SDRF) आणि गोकाक अग्निशमन दलाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद …

Read More »

भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा; मुख्य संशयित अटकेत, साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी गावात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचे ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चिवटगुंडी येथील रहिवासी महांतेश बसप्पा बोगूर (वय २९) …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

  बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली येथील शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली. पर्यावरण संरक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी केले. क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी, प्रकल्प अध्यक्षा …

Read More »

बेंगळूर ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगची चमक; दोन रौप्य, एक कांस्य पदक

  बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने बेंगळूर येथील बसवनगुडी जलतरण तलावात आयोजित ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचा जलतरणपटू कुमार तनुज सिंग याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत तनुजने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेले व्यक्तिमत्त्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, आत्मविश्वास वाढविणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि आधुनिक युगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना व आर्यन फाउंडेशनकडून विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

  बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना आणि आर्यन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खडेबाजार येथील श्री विठ्ठलदेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत कृष्णा मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमात मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच मंदिरासमोरील रस्ता मजुकर यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीट करून भाविकांसाठी अधिक …

Read More »

संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे

  भव्य ‘काव्य लेखन कार्यशाळा’ उत्साहात संपन्न; नवोदित कवी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण बेळगाव : कार्यशाळेत नवोदित कवी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना कविता लेखनाचे तंत्र, रचना, आशय, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचे विविध पैलू यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्ते मार्गदर्शक कवी श्री. शिवाजी शिंदे यांचे प्रभावी …

Read More »