






रायबाग येथील दत्त मंदिर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : फटाके फुटल्याने घराला आग लागून घरातील सजावटीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जळून खाक झाल्याची घटना रायबाग शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फटाके फुटल्यानंतर जवळच असलेल्या एका घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घरात सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध वस्तूंनी पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. आगीच्या तीव्रतेमुळे घराचेही नुकसान झाले आहे.
अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. आगीच्या ज्वाळा पाहून नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta