Sunday , November 22 2026
Breaking News

मारिहाळ पोलिसांचा गावठी दारू विक्रीवर छापा; एकाला अटक

Spread the love

७ लिटर गावठी दारू जप्त

बेळगाव : बेकायदा गावठी दारू विक्रीविरोधात मारिहाळ पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७ लिटर गावठी दारू आणि दोन प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या दारूची किंमत १,४०० रुपये आहे.

१३ नोव्हेंबर रोजी मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागप्पा निंगाप्पा पुजेरी (रा. अष्टे, बेळगाव) हा आपल्या गावात बेकायदेशीररीत्या गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी आरोपीकडून दोन प्लास्टिक कॅनमध्ये ठेवलेली सुमारे ७ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्नाटक अबकारी कायदा १९६५ च्या कलम ३२ व ३४ अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.

या कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी मारिहाळ पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *