





उचगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ, उचगाव यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि सोसायटीचे संस्थापक चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सोसायटीच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे संचालक किशोर पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. बाळकृष्ण देसाई, मारुती सावंत, चंद्रकांत देसाई, कविता जाधव, सुरेश बेनके, निळकंठ कुरबुर आणि प्रवीण देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ, अमरज्योत शिक्षण सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच श्री मळेकरणी हायस्कूल, श्री नागनाथ हायस्कूल आणि श्री रामलिंग हायस्कूलचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पी. आर. चलवेटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोसायटीचे सचिव के. एन. कदम यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta