





मुतगे येथे बालदिन उत्साहात साजरा
मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक विभागाच्या वतीने बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. आर. तिरविर हे होते. प्रारंभी प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मुख्याध्यापक तिरविर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना शिवाजी हसनेकर म्हणाले, “मुलांचे बालपण जपले पाहिजे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांना मैदानावर खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे. लहान मुले ही निरागस असतात. या वयातच त्यांच्यावर वाचनाचे, खेळाचे आणि संस्काराचे संस्कार केले तरच भावी पिढी सक्षम बनेल.”
यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. जाधव, अर्चना पाटील, आशा गाडेकर, स्नेहल पावले, कल्पना पाटील, शिल्पा पाटील, विनया निकम, प्रणाली पाटील, अनिता मुंगारे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पाटील यांनी केले, तर व्ही. एम. खामकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta