Sunday , November 22 2026
Breaking News

बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

Spread the love

 

खादरवाडी क्रॉस येथील न्यू महावीर नगरमधील घटना; सोन्याचे दागिने, चांदीची समई आणि रोकड चोरीला

बेळगाव : खादरवाडी क्रॉस परिसरातील न्यू महावीर नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी परशुराम पाटील (वय ४४, रा. न्यू महावीर नगर, खादरवाडी क्रॉस) यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पाटील हे १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास घराला कुलूप लावून खानापूर तालुक्यातील नंदगड येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

११ नोव्हेंबर रोजी सकाळी पाटील घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या झुमक्यांची एक जोडी, २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कंगण, ५० ग्रॅम वजनाची चांदीची समई आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

घटनेची माहिती मिळताच पाटील यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. उद्यमबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *