






देसूर : येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या (१९२६-२०२६) ऐतिहासिक शतक महोत्सवाला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

या महोत्सवाचे श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि त्यांच्या पत्नी ज्योती कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दिंडीचे विधिवत पूजन करून शतक महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
शंभर वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या शाळेच्या शतक महोत्सवामुळे देसूर गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याला शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta