बेळगाव : कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगांवच्या मानस फुटबॉल अकादमीने सोलापूरच्या समर्थ क्रीडा फुटबॉल क्लबला नमवित या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. उपांत्य सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने एमबीबीएस गोवा क्लबचा 4-0 असा पराभव केला विजयी संघाच्या …
Read More »कंग्राळी बुद्रुकमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे सोमवारी सकाळी एका ट्रकचालकाचा मृतदेह त्याच्याच ट्रकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गजानन वामन हुरुडे (रा. कलमेश्वर गल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हुरुडे यांनी रविवारी रात्री आपला ट्रक कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर उभा केला होता. त्यानंतर ते वाहनातच झोपले होते. …
Read More »बेळगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: शिवानंद निलण्णावर याला १० दिवसांची सीआयडी कोठडी
बेळगाव : बेळगावमधील बहुकोटी गैरव्यवहारातील संशयित आरोपी शिवानंद निलण्णावर याला न्यायालयाने १० दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालय कक्षात न्यायाधीश आणि आरोपी यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली असून, पुढील चौकशीसाठी आरोपीला बंगळुरूला हलवण्यात येत आहे. बेळगावचे २ रे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील दावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भावी काळात घेण्यात येणारे कार्यक्रम याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस …
Read More »शिवम असोसिएट्सवरील सीआयडी कारवाईमुळे करवे जिल्हाध्यक्ष अडचणीत
बेळगाव : बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बेळगाव महोत्सवा’त जमा झालेल्या निधीच्या गैरवापराबाबत नवे आरोप समोर आले आहेत. शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमातून सुमारे १.५ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाचे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष यांना …
Read More »किरकोळ वादातून नातवाकडून आजीची हत्या; अगसगे येथील घटना
बेळगाव : अगसगे गावात घरगुती वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. नातवाने संतापाच्या भरात आजीवर चाकूने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख बाळव्वा कलगौडा पाटील (७०) अशी झाली आहे. तर कलगौडा अप्पय्यागौडा पाटील (२४) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची …
Read More »बेळगाव महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय : प्रा. सुनीलकुमार लवटे
बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सीमाभागातील मराठी माणूस आजही संघर्ष करत असून बेळगाव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कविमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ …
Read More »धाब्यावरील स्वयंपाकी व वेटरला मारहाण प्रकरणी आरोपी निर्दोष
बेळगाव : “भात जास्त शिजलेला का दिला? चांगले जेवण द्यायला येत नाही का?” असा जाब विचारत धाब्यातील स्वयंपाकी आणि वेटरला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात दुसरे जेएमएफसी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी सिद्धाप्पा चांगाप्पा तुडयेकर (वय ३५, …
Read More »दिल्लीमध्ये युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच भव्य भवन उभारणार; मंत्री सतीश जारकीहोळी यांची घोषणा
बेळगाव : जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायतीच्या वतीने सुवर्ण विधानसभा संकुलात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव मधील सुवर्णसौध येथे आज ‘बेळगाव प्रकाश’ उपक्रमांतर्गत २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी …
Read More »देवराज अर्स कॉलनी येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू; बचाव पथकाला मृतदेह शोधण्यास यश
बेळगाव : आज दुपारी देवराज अर्स कॉलनी येथील एका तलावात एक अत्यंत दुःखद घटना घडली, ज्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण पोहण्यासाठी तलावात उतरला होता; परंतु दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta