Sunday , November 22 2026
Breaking News

किणयेतील सरस्वती हायस्कूलला गणराया बीसी ग्रुपची २५ हजारांची देणगी

Spread the love

 

 

बालदिनानिमित्त शैक्षणिक उपक्रमाला हातभार; कलोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

किणये : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल, किणये येथे बालदिनाचे औचित्य साधून श्री गणराया बीसी ग्रुपच्या वतीने शाळेला २५ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र मल्लाप्पा डुकरे होते. प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस. वाय. बागेवाडी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. राजाराम मुतगेकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी पुंडलिक दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना गणराया बीसी ग्रुपच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. ग्रुपच्या वतीने आजवर अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले असून, त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मराठा शिक्षक कल्याण संघाचे अध्यक्ष विनायक पाटील उपस्थित होते. याप्रसंगी कलोत्सव स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना वैजनाथ डुकरे, राजू गुरव, सागर बिर्जे आणि रवी डुकरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सुभाष पाटील, अनिल पाटील, रामलिंग गुरव यांच्यासह गणराया बीसी ग्रुपचे सर्व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सौ. एम. पी. येळ्ळूरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. आर. वाय. पावले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *