Sunday , November 22 2026
Breaking News

अनगोळच्या आरव अनिकेत भोसलेची कर्नाटक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड!

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील रहिवासी आरव अनिकेत भोसले याची कर्नाटक राज्य मिनी ऑलिम्पिक-२०२६ स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे अनगोळसह संपूर्ण बेळगाव परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लहान वयातच फुटबॉल खेळामध्ये विशेष रुची निर्माण केलेल्या आरवने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आरवच्या या यशामागे सेंट पॉल्स स्कूलचे सर्व शिक्षक आई-वडील, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्याच्या या निवडीमुळे इतर होतकरू खेळाडूंनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

आरवने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

आरव अनिकेत भोसले हा टिळकवाडी येथील प्रसिद्ध सुरभी हॉटेल चे मालक श्री दामोदर भोसले यांचा नातू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *