






बेळगाव : सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) यांच्या वतीने सरकारी मराठी शाळा, कलखांब येथील विद्यार्थ्यांना बूट आणि मोज्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन कलखांब येथील श्री. प्रीतम जयवंत पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बूट व मोजे दान करून सामाजिक बांधिलकी जपली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
Belgaum Varta Belgaum Varta