







घुमटमाळ मारुती मंदिरात भजनांचा कार्यक्रम; २५ भगिनींचा सहभाग
बेळगाव : सुरेल स्वरांतून भक्तीचा सुंदर दरवळ पसरवत मधुर भजनांनी वातावरण भक्तिमय केले, अशा शब्दांत घुमटमाळ मारुती मंदिराचे सचिव अनंत लाड यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, वडगाव यांचे कौतुक केले.
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिराचा यावर्षी जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाचे मार्गदर्शक शंकर पाटील, अध्यक्षा मंगल अकनोजी आणि तबलावादक सविता सावंत यांच्यासह २५ महिलांनी विविध भक्तिगीते व भजने सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी घुमटमाळ मारुती मंदिराचे अध्यक्ष कुलदीप भेकने, उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी आणि खजिनदार रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते भजनी मंडळातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिव अनंत लाड यांनी भजनी मंडळाचे कौतुक करून सर्व सदस्यांचे आभार मानले. याप्रसंगी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta