







२० नोव्हेंबरला कोल्हापूरच्या दसरा चौकात एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन; निपाणीतून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असून सीमा भागातील मराठी भाषिकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आता निर्णायक जनसंघर्ष उभारण्याची गरज असून, सीमा लढ्यात सर्वांनी निर्धाराने सहभागी व्हावे, असे आवाहन निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी भाषिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सीमाप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, या उद्देशाने निपाणी येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयराम मिरजकर होते. यावेळी प्रा. अच्युत माने, विजयराव देसाई निपाणकर सरकार, रमेश निकम, नवनाथ चव्हाण, उदय शिंदे, प्रकाश रावण, लक्ष्मीकांत पाटील, कबीर वराळे, तुकाराम कोळी, अमोल शेळके, अमर विटे आणि एस. के. पाटील आदी उपस्थित होते.
निपाणीतून सकाळी रवाना होणार
शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता निपाणी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात सर्वांनी एकत्र जमायचे असून, तेथून कोल्हापूरकडे रवाना होण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जयराम मिरजकर (९३४१४१०६९९), बाबासाहेब खांबे (९३४२६२९६०१), उदय शिंदे (८९०४४४१०७०), नवनाथ चव्हाण (९५१३७७३७७७), अमोल शेळके (८८९२५७३७८८), लक्ष्मीकांत पाटील (९६११७६१०१०), के. डी. पाटील (९५३८४२१०७०), गणेश माळी (७०१९८२४०४७) किंवा अमर विटे (९१९९२२८७९६) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta