Sunday , November 22 2026
Breaking News

गोकाकजवळ भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर

Spread the love

 

मालदिन्नी क्रॉसजवळ लॉरी आणि कारची समोरासमोर धडक; कारचा चक्काचूर

गोकाक : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ पहाटेच्या सुमारास लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सवदत्तीकडे जाणारी कार आणि यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने येणारी लारी यांची मालदिन्नी क्रॉसजवळ जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्ती पुण्यातील मांद्रे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *