






बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी अवनीश पी. चव्हाण याने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रांकन – एक्सलन्स थ्रू ड्रॉइंग’ या चित्रकला स्पर्धेत अवनीशने हे यश संपादन केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॅटेगरी २ मध्ये त्याने आपल्या कलागुणांची उत्कृष्ट छाप पाडत प्रथम क्रमांक मिळविला.
अवनीशच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अवनीशच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta