बेळगाव (वार्ता) : खरीप हंगामात युरिया आणि इतर रासायनिक खतांचा पुरवठा, ई-केवायसीची सक्ती आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युरिया खरेदीसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून, अनेक ठिकाणी आधार पडताळणी आणि बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच खत …
Read More »कॅन्टोन्मेंटच्या विकासाला मोठी झेप; १४.६० कोटींच्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला मंजुरी
फूड कोर्ट, शॉपिंग-ऑफिस कॉम्प्लेक्स, ओपन एअर थिएटरसह आधुनिक सुविधांची उभारणी; महसूलवाढ, रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेकडे कॅन्टोन्मेंटची वाटचाल बेळगाव : कॅन्टोन्मेंट क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि महसुलाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने १४.६० कोटी रुपयांच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी मिळाली आहे. अर्बन चॅलेंज फंड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आधुनिक …
Read More »दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी; उद्यमबाग पोलिसांकडून दोन गाड्या जप्त
बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुरुप्रसाद नगर, गणेश मंदिरासमोर, कावेरी नगर येथील रहिवासी नागराज रामचंद्र आचारी यांची होंडा डिओ (KA-05-EW-5831) ही दुचाकी १७ …
Read More »गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी सर्व विभागांची तातडीची बैठक घेण्याची मागणी; मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या १२ दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाची पूर्वतयारी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, …
Read More »भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; पार्वती नगर, कंग्राळी बी.के. आणि कंग्राळी के.एच. परिसरातील नागरिकांमध्ये भीती
बेळगाव : पार्वती नगर, कंग्राळी बी.के. आणि कंग्राळी के.एच. परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. विशेषतः लहान मुलांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात भीती पसरली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत चार लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी …
Read More »वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या नंबर प्लेटविरोधात विशेष मोहीम; १०५ दुचाकींवर शहर वाहतूक पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या, नंबर लपवून ठेवलेल्या तसेच चुकीची किंवा सदोष नोंदणी क्रमांक प्लेट लावलेल्या दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५ दुचाकी अडवून त्यांची तपासणी केली. काही वाहनांवर नंबर प्लेट नसल्याचे, तर काही वाहनांवर नोंदणी क्रमांक …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व बेहेरे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शूज वाटप
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व बेहेरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल, हलशी येथे विद्यार्थ्यांना शालेय शूजचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. सुदन देसाई यांनी प्रस्तावना करून मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका काकतकर यांनी केले. यावेळी रोटरी …
Read More »जय किसान भाजी मार्केट वाद : उच्च न्यायालयाकडून नोटीस; १३ ऑगस्टला पुढील सुनावणी
बेळगाव : जय किसान होलसेल भाजी मार्केटसंदर्भातील वादात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दाखल करण्यात आलेल्या रिट अपीलावर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. हे अपील सिद्धगौडा मोदगी यांनी एकल न्यायाधीशांच्या आदेशाविरोधात दाखल केले आहे. सुनावणीदरम्यान विभागीय खंडपीठाने या प्रकरणातील एका महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. कर्नाटक …
Read More »सरकारी मराठी शाळेच्या समस्यांची अधिकाऱ्यांकडून पाहणी; कायमस्वरूपी मुख्याध्यापक व शिक्षक देण्याची एसडीएमसीची मागणी
मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील एसडीएमसीची समितीने गट शिक्षणाधिकारी श्री. पुंडलिक चव्हाण यांची भेट घेऊन शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण (PE) शिक्षक तसेच आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी श्री. पुंडलिक चव्हाण तसेच गट …
Read More »बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta