Friday , November 6 2026
Breaking News

जय किसान भाजी मार्केट वाद : उच्च न्यायालयाकडून नोटीस; १३ ऑगस्टला पुढील सुनावणी

Spread the love

 

बेळगाव : जय किसान होलसेल भाजी मार्केटसंदर्भातील वादात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दाखल करण्यात आलेल्या रिट अपीलावर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. हे अपील सिद्धगौडा मोदगी यांनी एकल न्यायाधीशांच्या आदेशाविरोधात दाखल केले आहे.

सुनावणीदरम्यान विभागीय खंडपीठाने या प्रकरणातील एका महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. कर्नाटक अपिलीय न्यायाधिकरण (KAT) समोरील कार्यवाहीवर मर्यादा कायदा (Limitation Act) लागू होतो का, याबाबत सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

याचबरोबर, रिट अपीलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत KAT समोरील कोणतीही कार्यवाही ही उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे स्पष्ट निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून, त्या दिवशी या वादाच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

जय किसान होलसेल भाजी मार्केट प्रकरणातील हा आदेश महत्त्वाचा मानला जात असून, संबंधित पक्षांसह व्यापारी वर्तुळाचे लक्ष आता १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *