Sunday , September 20 2026
Breaking News

सरकारी मराठी शाळेच्या समस्यांची अधिकाऱ्यांकडून पाहणी; कायमस्वरूपी मुख्याध्यापक व शिक्षक देण्याची एसडीएमसीची मागणी

Spread the love

 

 

मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील एसडीएमसीची समितीने गट शिक्षणाधिकारी श्री. पुंडलिक चव्हाण यांची भेट घेऊन शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षण (PE) शिक्षक तसेच आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते.

या निवेदनाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी श्री. पुंडलिक चव्हाण तसेच गट संसाधन समन्वयक (GRP) सौ. जाळकी मॅडम यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांची उपलब्धता, वर्गखोल्यांची आवश्यकता, नव्याने सुरू झालेल्या LKG-UKG वर्गांची व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींची पाहणी केली. यावेळी सर्व समस्या जाणून घेऊन त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी एसडीएमसीची अध्यक्ष श्री. गजानन छप्रे, उपाध्यक्षा सौ. मोहिनी बाळेकुंद्री, सदस्य श्री. अमोल लाड, श्री. परशराम कोलेकर, श्री. प्रशांत नांदेडकर, श्री. भरत पाटील, श्री. अमित बाळेकुंद्री, सौ. रूपा कनबरकर, सौ. पूजा चौगुले तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *