Sunday , September 20 2026
Breaking News

मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील; आमदार शशिकला जोल्ले

Spread the love

 

 

अमृत नगरोत्थान योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वितरण

निपाणी (वार्ता) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळेच सर्वसामान्य वर्गाला अधिकार, हक्क मिळाले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. ततालुक्याचा विकास करीत असताना जात, पंथ, पक्ष पाहिले नाही. बोरगाव शहराच्या विकासासाठी आपण सदैव नगरपंचायतीसोबत आहे. विकास हाच मुद्दा ठेवून राजकारण करीत असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील नगरपंचायतमध्ये मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
नगरोत्थान योजनेसाठी शासनाकडून ५ कोटींची अनुदान मंजूर झाला आहे. त्यामध्ये ४ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये २ कोटी २५ लाखाच्या अनुदानातूनरस्ते गटार व पेव्हिंग ब्लॉक, कामेहाती घेण्यात आले आहे. एस.सी.एस.टी. कुटुंबातील ८८ लाभार्थींना सोलार, इतर जातीच्या कुटुंबीयांना ८२ सोलार लाईट, दिव्यांग योजनेतून २९ लाभार्थ्यांनाइलेक्ट्रिक शिलाई मशीन, उचशिक्षित असलेल्या २ विद्यार्थ्यांना लॅपटॉप, अंग विकलांना तीनचाकी २ वाहने, एससी एसटी कुटुंबातील ३३ कुटुंबीयांना आरओ प्लांट मंजूर झाले आहेत. यासाठी ७८ लाखांचा अनुदान मंजूर झाले आहेत.
नगराध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, नगरोत्थान अनुदानासाठी काँग्रेस सरकारने विशेष अनुदान दिले आहे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचेही याकामासाठी विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले.मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा रुक्साना अपराज, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकु मगदूम, शरद जंगटे, शोभा हावले, माणिक कुंभार, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे, जावेद मकानदार, सुवर्णा सोबाने, रोहित पाटील, संगीता शिंगे, गिरिजा वठारे, यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *