Sunday , September 20 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व बेहेरे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शूज वाटप

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व बेहेरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल, हलशी येथे विद्यार्थ्यांना शालेय शूजचे मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. सुदन देसाई यांनी प्रस्तावना करून मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका काकतकर यांनी केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष श्री. संतोष हत्तरकी, माजी अध्यक्ष श्री. संजीव नाईक, बेहेरे फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती रत्ना बेहेरे तसेच श्रीमती जयश्री नाईक, श्रीमती आरती अंगडी, श्रीमती ममता, श्रीमती संगीता बडमंजी, श्रीमती गीता वालावलकर, श्रीमती रेखा नाशी आदींसह रोटरी क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. रोटरी क्लबतर्फे भविष्यात शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. बी. जी. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व बेहेरे फाउंडेशनचे आभार मानले.
सौ. शामल बेळगावकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शिक्षक श्री. शंकर रागीपाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *