Sunday , September 20 2026
Breaking News

‘चला खेळूया मंगळागौर 2026’ द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सव 8 व 9 ऑगस्टला

Spread the love

 

बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, कला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजी गुजरात भवन, शास्त्रीनगर, बेळगाव येथे उत्साहात पार पडणार आहे.

महोत्सवात महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर स्पर्धा, श्रीमंत समृद्ध वधू स्पर्धा, मुलींसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, तसेच लहान मुला-मुलींसाठी वारकरी थीम फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, महिला उद्योजिकांसाठी विविध व्यावसायिक स्टॉल्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधीही दिली जाणार आहे.

बेळगाव व परिसरातील महिला, मुली आणि नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच स्पर्धांसाठी आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महोत्सवाचे आयोजन सखी ग्रुपच्या संस्थापक व अध्यक्षा रश्मी चिगोडे तसेच संस्थापक व उपाध्यक्षा लोभा गोंधकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 9008665048 आणि 9284207556 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष आकर्षण : WhatsApp Status Competition देखील या महोत्सवात आयोजित करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *