Monday , September 21 2026
Breaking News

दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी; उद्यमबाग पोलिसांकडून दोन गाड्या जप्त

Spread the love

 

बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गुरुप्रसाद नगर, गणेश मंदिरासमोर, कावेरी नगर येथील रहिवासी नागराज रामचंद्र आचारी यांची होंडा डिओ (KA-05-EW-5831) ही दुचाकी १७ जुलै रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी २२ जुलै रोजी उद्यमबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ७३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय यू. बी. कट्टीकर, पीएसआय प्रवीण बिरादार आणि तपास पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीस गेलेली होंडा डिओ (KA-05-EW-5831) तसेच KA-24-S-2395 क्रमांकाची आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनांची एकूण किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही अल्पवयीनांविरुद्ध बाल न्याय (किशोर न्याय) कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास उद्यंबाग पोलीस करत आहेत.

या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (DCP) यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *