Monday , July 27 2026
Breaking News

निपाणी येथे भीषण अपघातात एक जण ठार; मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी

Spread the love

 

निपाणी ( वार्ता) : निपाणी – मुरगूड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडी मुंबईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. शिवाजी प्रभाकर शिंदे (वय ३३) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी निता शिवाजी शिंदे (वय ३०) मुलगा श्रवण शिवाजी शिंदे (वय ९) कोडणी असे जखमीची नावे आहेत. तर मुलगी राधिका शिवाजी शिंदे (वय १२) किरकोळ जखमी झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील ४ युवक पर्यटनासाठी सावंतवाडीला गेले होते. तर शिवाजी शिंदे यांचे स्वतःचे निपाणीत बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्रीचे दुकान असून पत्नी दुसऱ्या लॉन्ड्रीत कामास आहे. काम संपल्यानंतर रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळे शिवाजी हे पत्नी व दोन मुलांसह निपाणी येथे नातेवाईंकाकडे भोजन करण्यासाठी गेले होते. भोजन करून घरी परतत असताना पर्यटन ओटोपल्यानंतर सावंतवाडीहून निपाणीमार्गे मुंबईला जाणाऱ्या भरधाव कारने निपाणी मुरगुड रोडवरील हालसिद्धनाथ सर्विसिंग सेंटर समोर मुरगुडहून निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कोडणीकडे जाणाऱ्या शिवाजी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चक्काचूर होऊन शिवाजी याचा उजवा पाय मांडीपासून निकामी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच शिवाजीचा मुलगा श्रवण याच्या उजव्या मांडीचा चेंदामेंदा झाला तर पत्नीच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी फॅक्चर झाले. अपघातानंतर कारमधील दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर अन्य दोघांना नागरीकांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच कोडणीतील युवकांनी घटनास्थळी तात्काळ घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी निपाणीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविले. मात्र मध्यरात्री उपचार सुरू असतानाच शिवाजी यांचा मृत्यू झाला. सध्या सीपीआरमध्ये शिवाजी याची पत्नी व मुलगा श्रवण यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सोमवारी सकाळी १२ वाजता शिवाजी याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली असून शिवाजी याची बहिण सुजाता राजेंद्र परीट रा. अंमलझरी यांनी फिर्याद दिली आहे. मयत शिवाजी याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत प्राचार्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *