Monday , July 27 2026
Breaking News

अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Spread the love

 

शहराध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या मतमतांतर बैठकीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली

बेळगाव : कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना, बेळगाव शहर काँग्रेस कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

संगोळी रायण्णा चौकातील काँग्रेस कार्यालयात एआयसीसीचे निरीक्षक मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष निवडीसंदर्भात मतमतांतरे जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार रमेश कुडची यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

बैठकीदरम्यान शाब्दिक वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळात माजी आमदार रमेश कुडची यांचे समर्थक हेमंत लेंगडे यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेंगडे हे सामाजिक माध्यमांवर पक्षातील काही नेत्यांविरोधात सातत्याने पोस्ट करत असल्याचीही चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोरे गल्ली पंच मंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love  बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली कोरे गल्ली पंच मंडळ संस्था आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *