Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगाव विद्यासागर शैक्षणिक संस्थेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विद्यासागर शैक्षणिक संस्था, श्री विद्यासागर कन्नड आणि इंग्रजी माध्यम प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, श्री विद्यासागर एज्युकेशन कॉलेज (बी.एड.), श्री विद्यासागर आयटीआय कॉलेज आणि संजय फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन झाले. श्री विठ्ठल राजखुमाईच्या प्रतिमेचे पूजन आणि पालखी पूजा केली.
कार्यक्रमात विठ्ठल रखुमाई यांची पालखी, घोडे, वाद्ये, विद्यार्थ्यांची रूपके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि असंख्य सैनिकांसह शहरात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमास संयोजक मलागौडा म्हैशाळे, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, रावसाब तेरादळे, बाळासाहेब कमते, विद्याधरा अम्मण्णावर, अनुजा हवले, ऐश्वर्या हवळले, शिवाप्पा माळगे, मुख्याध्यापक राजू खिचडे, श्रीकांत कोळी, बी.एड महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वसुंधरा थोरात, आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य तुषारा बोरगावे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप मुरताळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारीव विद्यार्थी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *